वीज ग्राहकांचे नुकसान व पदाचा गैरवापर करणार्‍या फलटणच्या कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची महावितरणकडे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण उपविभागातील निविदा क.टी.-२१/२०२३-२४ बाबत प्रलंबित टेंडर प्रक्रियेमुळे शेतकर्‍यांचे व घरगुती ग्राहकांचे नुकसान झाले आहे. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे काळ्या यादीत गेलेल्या ठेकेदारांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पात्र करून त्यांना टेंडर देण्यात आले. यासाठी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, फलटण हे जबाबदार आहेत. या प्रकरणी बनावट कागदपत्रांच्या आधारे सहभाग घेतलेल्या ठेकेदार कंपन्यांवर व पदाचा गैरवापर केलेल्या कार्यकारी अभियंता, फलटण यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व या प्रकरणी कारवाईस पात्र असलेले कार्यकारी अभियंता, फलटण अकारण परत टेंडर प्रक्रिया राबवून पात्र ठेकेदारांना आर्थिक व मानसिक त्रास देवून वेठीस धरत आहेत. या प्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हा प्रवक्ता आझादसिंह उर्फ शंभूराज खलाटे यांनी मुख्य अभियंता, महावितरण बारामती यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.

अर्जात खलाटे यांनी म्हटले आहे की, फलटण उपविभागातील निविदा क.टी.-२१/२०२३-२४ बाबत टेंडर प्रक्रियेमध्ये दोषी असणार्‍या काही कंपनींना अधिकाराचा गैरवापर करीत कार्यकारी अभियंता, उपविभाग फलटण यांनी पात्र केले असून या विषयावर संचालक, पुणे यांचे आदेशावरून चौकशी समिती स्थापन झाली होती. या चौकशी समितीच्या अहवालात अपात्र/काळया यादीत टाकण्यात येणार्‍या ठेकेदारांना पात्र करून पदाचा गैरवापर केल्याचा ठपका कार्यकारी अभियंता, फलटण यांच्यावर ठेवल्याचे दिसत आहे. कार्यकारी अभियंता यांच्या निर्णयामुळे गेली ५ ते ६ महिने निविदा क.टी.-२१/२०२३-२४ बाबत टेंडर प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे नवीन वीज जोडणी मग ती घरगुती, शेती, उद्योग या सर्व नवीन वीज जोडण्या बंद असल्यामुळे फलटण विभागातील ग्राहकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

या नुकसानीस कार्यकारी अभियंता, फलटण जबाबदार आहेत. या प्रकरणी बनावट कागदपत्रांच्या आधारे सहभाग घेतलेल्या कंपन्यांवर व पदाचा गैरवापर केलेल्या कार्यकारी अभियंता, फलटण यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व या प्रकरणी कारवाईस पात्र असलेले कार्यकारी अभियंता अकारण परत टेंडर प्रक्रिया राबवून पात्र ठेकेदारांना आर्थिक व मानसिक त्रास देवून वेठीस धरत आहेत. या प्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी खलाटे यांनी मुख्य अभियंता, महावितरण, बारामती यांच्याकडे केली आहे.


Back to top button
Don`t copy text!