दैनिक स्थैर्य । दि. १० नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण नगरपरिषदेमधील वर्ग ४ कर्मचारी कोणताही अधिकार नसताना तो फलटण नगरपरिषदेच्या बांधकाम विभागामध्ये कार्यरत आहे. तो मुख्याधिकारी व ठेकेदार यांच्या मधील दुवा म्हणून कऱ्यरात आहे. ठेकेदारांकडून तो कर्मचारी पैसे घेवून बिले काढण्याचे काम करतो. तरी त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे फलटण तालुकाध्यक्ष संदीप काकडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
फलटण नगरपरिषदेमधील बांधकामाच्या टेंडरमध्ये पैसे घेवून टेंडरची बिले काढण्याचे काम तो कर्मचारी करत आहे. ठेकेदाराचे काम पूर्ण नसतानाही टेंडरची बिले काढण्याची कामे नियमबाह्य आहे. या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून मुख्याधिकारी व अन्य पालिका कर्मचाऱ्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केलेली आहे. तरी त्याची चौकशी होवून त्याला त्याचा कामाच्या पदभाराप्रमाणे काम द्यावे व कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात संदीप काकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.