दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२३ | फलटण | फलटण शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून फळकूटदादांचे खुलेआमपणे ‘बर्थडे’ सेलिब्रेशन सुरू आहे. या बेकायदा सेलिब्रेशनचा सामान्यांना त्रास होत असल्याकारणाने या ‘बर्थडे’ सेलिब्रेशनवर कारवाई करावी, अशी मागणी फलटणच्या नागरिकांनी केली आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
फलटण शहरातील विविध चौकात, माळजाई परिसर, माळजाई मंदिर पिछाडी, गजानन चौक, महात्मा फुले चौक, आंबेडकर चौक, गिरवी नाका, डी. एड्. कॉलेज चौक इ. ठिकाणांसह इतर ठिकाणी सुद्धा फळकूटदादा किंवा पक्षाचे उमदे कार्यकर्ते यांचा वाढदिवस जल्लोषात म्हणजे अगदी वेळप्रसंगी डीजे किंवा साऊंड सिस्टीम लावून सुद्धा साजरा केला जातो. यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
काहीप्रसंगी तर पोलिसांना फोन करून सुद्धा कारवाई होत नसल्याचे मत काही सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.