खोटे गुन्हे दाखल करणार्‍या वन विभागाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

आ. शिवेंद्रसिंहराजे; सज्जनगड फाटा येथील कारवाईची चौकशी करण्याची मागणी

स्थैर्य, सातारा, दि. २९ : कारी ता. सातारा येथील काही युवकांना शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देवून कोर्टासमोर खोटे बोलण्यास भाग पाडले. काहीही मुद्देमाल, जंगली प्राण्याचे अवशेश अथवा शिकारीसाठी लागणारी काठी, बरसा अथवा अन्य शस्त्र त्यांच्याकडे सापडले नाही. तरीही खोट्या गुह्यात अडकवून युवकांना नाहक त्रास देणार्‍या आणि मारहणार करणार्‍या सातारा वन विभागाच्या अधिकारी शितल राठोड आणि त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांची कायदेशीर चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी उप वन संरक्षक भारत सिंह हाडा यांच्याकडे करतानाच लोकांना नाहक त्रास देणार्‍या अधिकार्‍यांची मुजोरी खपवून घेणार नाही, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांना दिला.

कारी येथील प्रकाश जिमन, निलेश जिमन, दिपक किर्दत, विश्‍वास किर्दत, विकास जिमन आणि मालदेव वस्ती, ठोसेघर येथील गंगाराम पांढरमिसे यांच्यावर वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शितल राठोड, वनपाल योगेश गावीत, राजकुमार मोसलगी, मारुती माने, रणजीत काकडे, वाहनचालक धनंजय लादे यांनी मारहाण करुन खोटा गुन्हा दाखल केला. याबाबत संबंधीत युवकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करुन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. युवकांवर अन्याय झाल्याचे समजल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उप वनसंरक्षक हाडा यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली. दि. १२ मे रोजी मालदेववस्ती येथे पांढरमिसे यांच्या घरुन जेवण करुन कारी येथील प्रकाश जिमन, निलेश जिमन, दिपक किर्दत, विश्‍वास किर्दत, विकास जिमन परत गावी जात असताना रात्री १०.५० च्या सुमारास विकास जिमन व दिपक किर्दत या दोघांना राठोड आणि त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांनी सज्जनगड ङ्गाटा येथे अडवले आणि मारहाण केली. यानंतर त्यांनी युवकांचाच ङ्गोन घेवून इतर सहकार्‍यांना ङ्गोनकरुन बोलावून घेतले. पांढरमिसे आणि शितल राठोड यांचा पुर्वीचा वाद असल्याने राठोड यांनी जुन्या रागातून या युवकांना मारहाण केली. तसेच आता तुम्हाला चांगलेच अडकवते, तुमचे काही खरे नाही असे म्हणून वरील सर्वांवर शिकारीचा खोटा गुन्हा दाखल केला.

त्या सर्वांना अटक करुन त्यांच्याकडून कोर्‍या कागदावर सह्या घेतल्या. कोर्टासमोर गुन्हा कबुल करण्यासाठी खोटे बोला अन्यथा जीवे मारु अशी धमकीही वन दिली असल्याची तक‘ार अन्यायग‘स्त युवकांनी केली आहे. तसेच कोर्टाने आदेश देवूनही जप्त केलेल्या दुचाक्या आणि मोबाईल राठोड यांनी युवकांना परत केले नाहीत. कायदा पायदळी तुडवून मुजोरी आणि मनमानी करणार्‍या राठोड आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या सर्वांची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हाडा यांच्याकडे केली. याबाबत चौकशी करुन कारवाई करु, असे हाडा म्हणाले. दरम्यान, शिकार करणारांवर कडक कारवाई करा पण, निष्पाप लोकांवर शिकारीचे खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना त्रास देवू नका. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले.

वरिष्ठ अधिकार्‍यांचीही चौकशी करा

दरम्यान, शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्याचा प्रकार पिरवाडी येथेही घडला होता. याप्रकरणी वन विभागाच्या चार कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे. यात चार कर्मचार्‍यांचा सहभाग आहे मग हा प्रकार त्यांच्या वरिष्ठांना माहीत नाही का? असा सवाल आ. शिवेंंद्रसिंहराजे यांनी हाडा यांना केला. त्यामुळे या प्रकारात वरिष्ठ अधिकार्‍यांचीही चौकशी करा आणि दोषी आढळणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई करा, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे हाडा यांना म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!