
दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२५ | फलटण | तालुक्यातील टाकळवाडे गावात 18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 07:00 ते 07:30 च्या सुमारास एक गंभीर मारहाणीची घटना घडली.
अजित दादासो मिंड शेतात पीव्हीसी पाईप जोडत होते, तेव्हा कैलास दादासो मिंडने पाईप तोडल्याचे पाहून अजितने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. या वादातून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र संघर्ष झाला. कैलास दादासो मिंडने अजित दादासो मिंडला लोखंडी कोयत्याने मारहाण केली, तर विलास मिंड, नर्मदा दादासो मिंड, व मनिषा विलास मिंडने अजित दादासो मिंड व त्याच्या पत्नी रुपालीला हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.
कैलास दादासो मिंडच्या घरासमोर अजित दादासो मिंडने कैलास दादासो मिंडला मारहाण केली व त्याच्या भावाला व आईला देखील मारहाण केली. या घटनेत दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. जखमी व्यक्तींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे.
दोन्ही पक्षांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, व जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपांतर्गत तक्रार दाखल केली गेली आहे. तहसिलदार ऑफिस येथे शेतात जाण्याच्या रस्त्याचे वादावरुन दावा दाखल असून सुनावणी चालू आहे.