टाकळवाडे ग्रामस्थांनी सतर्क रहावे : खासदार रणजितसिंह


स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील टाकळवाडे येथे गेल्या आठवडाभरापासून बिबट्याने उच्छाद मांडला असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे आहे. तरी टाकळवाडे ग्रामस्थांनी सतर्क राहून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावे असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टाकळवाडे ता. फलटण येथे भेटी प्रसंगी केले, या सोबतच वन विभागामार्फत कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची सविस्तर माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. या वेळी वनविभागाने सर्वतोपरी प्रयन्त करून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे असे आदेशही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वनविभागास या वेळी दिले. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!