दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । मुंबई । नौदलाचा नवा ध्वज छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अर्पण करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील ही अलौकिक घटना प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रतेजाचे स्फुलिंग चेतविणारी आहे. स्वत्व जागवणारा आणि देशाभिमानाचे रोमांच उभे करणारा हा प्रसंग आहे.
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. महाराष्ट्राची मान उंच झाली.. शान वाढली.
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी कोचीमध्ये नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. हा नवा ध्वज भारतीय आरमाराचे जनक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे.
या नव्या ध्वजामधून ब्रिटीशांच्या सर्व खुणा काढण्यात आल्या. आता या ध्वजावर भारतीय छाप आहे.
आजची ही घटना आपल्या गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसणारी आहे. भारतीयत्वाच्या भावनेने ओतप्रोत हा नवा ध्वज आम्हाला आत्मबल देईन.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. त्या तेजाला मानाचा मुजरा..
जय जिजाऊ,जय शिवराय..
– चंद्रशेखर बावनकुळे
प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र