टेल एंड वृद्धीने निर्देशांक सकारात्मक स्थितीत स्थिरावले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०३: आजच्या सत्रात जागतिक पातळीवर संमिश्र संकेत दिसल्याने बाजार सुस्तावलेल्या स्थितीत सुरु झाला. दिवस पुढे गेला, तसा निर्देशांकाने थोडेफार नुकसान भरून काढायला सुरुवात केली. काही हेवीवेट स्टॉक्समध्ये प्रॉफिटबुकिंग दिसून आले. तथापि, मिड-सेशननंतर खालील पातळीवर अचानक खरेदी दिसून आली. परिणाम इंडेक्स उच्चांकी स्थितीतच गेला. तसेच निफ्टीत थोडाफार नफा दिसून आला.

एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे चीफ ऍनलिस्ट- टेक्निकल अँड डेरिवेटिव्हज श्री समीत चव्हाण यांनी सांगितले की, दिवसाच्या पहिल्या भागात, थोडीफार सुधारणेची गती दिसून आली. नकाराचा अर्थ मोठी घसरण किंवा खबरदारीचे संकेत, असा घेतला जातो. काही काळापासून बाजारात सावकाश वृद्धी सुरु आहे. या प्रक्रियेत नवे विक्रमही केले जात आहे. ब्रिदसरम्यान या घटना स्पष्ट दिसू शकतात. त्यामुळे, हे आरोग्यदायी संकेत मानले पाहिजेत. मागील भाष्यात आम्ही १५४३०-१५४०० च्या जवळ प्रमुख सपोर्ट मानले होते. आजची सुधारणा पाहता, या सपोर्ट झोनजवळ आल्याचे दिसते. माघारीचा मेजर ट्रेंड दिसत नाही तोपर्यंत वृद्धी कायम ठेवू. तसेच बाजारात दीर्घकाळासाठी इंट्रा डे डिप्सही वापरता येतील.

सपोर्ट लेव्हलचा विचार करता, १५४३०-१५४०० हा आता सॅक्रोसँक्ट झोन बनला आहे. तर दुसरीकडे १५६६०-१५७०० या इमिजिएट लेव्हलवर विचार केला पाहिजे. यापुढील निर्देशांकातील विशिष्ट ट्रेड्स सोपे होणार नाही. खरं तर, विशिष्ट स्टॉकची निवड करताना खूप विचार केला पाहिजे. आक्रमक बेटिंग टाळण्याचा आम्ही पुनरुच्चार करतो. तसेच योग्य जोखीम व्यवस्थापनाचाही सल्ला देतो.


Back to top button
Don`t copy text!