दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२२ । सातारा । सातारा शहर पोलीस ठाणेस दाखल असलेल्या मालमत्ते विरुद्ध व शरीराला विरुद्धचे गुन्ह्यातील सराईत इसम अक्षय संभाजी आढाव वय 21 वर्षे राहणार क्षेत्र माहुली तालुका जिल्हा सातारा यास माननीय उपविभागीय दंडाधिकारी सातारा भाग सातारा यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष या कालावधी करता हद्दपार केले होते. तरी देखील तो माहूली गावचे परिसरात येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने….त्यास पकडणे करिता ठिकठिकाणी पोलीस वॉचवर थांबून होते…. काल रात्रीच्या 1.00 वाजण्याच्या सुमारास सदरचा गुंड छुप्या पद्धतीने येत असताना दिसून आला… त्यास पोलिसांनी ओळखून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागताना पोलिसांनी त्यास जागीच पकडले व त्यास अटक करून त्याचे विरुद्ध तडीपार आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंद केलेला आहे.
सदरची कारवाई महिला पोलीस निरीक्षक, श्रीमती.वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले,अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार,अभय साबळे सागर गायकवाड ,संतोष कचरे गणेश भोंग, गणेश घाडगे यांनी कारवाई केलेली आहे.