सातारा शहर पोलिसांकडून तडीपार गुंड अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा शहरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला गुंड विकास मुरलीधर मुळे वय -20 रा पॉवर हाऊस झोपडपट्टी याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली . हद्दपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली .

सोमवार दि १५ रोजी गुंड विकास मुळे हा तडीपारीचा आदेश असताना सातारा शहरात आल्याची गोपनीय माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली होती . पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सलं , सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, हवालदार अविनाश चव्हाण, सुजित भोसले, अभय साबळे, सागर गायकवाड , धुमाळ व कचरे यांच्या पथकाने मुळे याला अटक केली .न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे .

आमीर इम्तियाज मुजावर – पिरवाडी, आमीर सलीम शेख – वनवासवाडी, प्रल्हाद रमेश पवार रा केसरकर पेठ, जीवन शहाजी रावते दत्तनगर कोडोली, अभिजीत अशोक भिसे दत्तनगर कोडोली, जगदीश रामेश्वर मते रांगोळे कॉलनी शाहुपुरी, सौरभ संजय जाधव मोळाचा ओढा, अभिजीत राजू भिसे रा मोळाचा ओढा, आकाश हणमंत पवार रा सैदापूर या गुंडांना सातारा शहरातून तडीपार करण्यात आले आहे . कोणी तडीपार गुंड दिसून आल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!