टीएसी सिक्युरिटी पेमेंट सुरक्षा बाजारात करणार क्रांती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२३ । मुंबई । टीएसी सिक्युरिटी ही जोखमीवर आधारित असुरक्षितता व्यवस्थापन व सायबर धोका परिमाण क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी पीसीआय एएसव्हीच्या (पेमेंट कार्ड इंडस्ट्री अॅप्रूव्ह्ड स्कॅनिंग व्हेंडर) माध्यमातून संरक्षित पेमेंट माहिती देऊ करत आहे तसेच याच्या व्यवस्थित स्वीकृती व उपयोजनाची हमी देत आहे. सध्याच्या ईएसओएफ सोल्यूशनसोबतच हे उत्पादन दिले जाणार आहे. टीएसी सिक्युरिटीच्या सर्व ग्राहकांना हे विनाशुल्क दिले जाणार आहे. या नवोन्मेष्कारी उत्पादनाच्या माध्यमातून, सर्वांत मोठी असुरक्षितता व्यवस्थापन (व्हल्नरॅबिलिटी मॅनेजमेंट अर्थात व्हीएम) कंपनी होण्याचे उद्दिष्ट टीएसी सिक्युरिटीने ठेवले आहे.

टीएसी सिक्युरिटीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिशनीत अरोरा म्हणाले, “कंपन्यांचा पेमेंट कार्ड सुरक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारे आमचे ईएसओएफ सोल्यूशन बाजारपेठेत आणताना आम्ही उत्साहित झालो आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य आणि ग्राहकांच्या यशाप्रती असलेली आमची बांधिलकी यांचा मिलाफ साधून टीएसी सिक्युरिटी असुरक्षितता व्यवस्थापनाच्या नवीन युगाचा मार्ग मोकळा करून देत आहे. आमच्या सर्वसमावेशक व सक्रिय सायबर सुरक्षितता उत्पादनांच्या माध्यमातून, कंपन्यांना, उत्क्रांत होत जाणाऱ्या जोखमींच्या दोन पावले पुढे राहण्याची क्षमता देण्याचे, उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. आमचे ध्येय केवळ एक सेवा पुरवणे हे नाही, तर अद्वितीय मूल्य देऊ करणारे, अपसेलिंग व क्रॉससेलिंगच्या संधी पुरवण्याची संभाव्यता असलेले तसेच पीसीएल एएसव्ही बाजारपेठेत क्रांती आणणारे एक उत्पादन देणे हे आहे.”

टीएसी सिक्युरिटीने त्यांच्या ईएसओएफ सोल्यूशनमध्ये पीसीआय एएसव्ही साधनाचा समावेश करून सुमारे १० लाख वापरकर्त्यांना लक्ष्यसमूहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सुरुवातीला ही सेवा विनाशुल्क दिली जाणार आहे. जेणेकरून कंपन्यांना तिचे लाभ प्रत्यक्ष अनुभवता येतील. त्यानंतर सबस्क्रिप्शनवर आधारित नमुना आणला जाणार आहे. त्यामुळे हे सोल्यूशन परवडण्याजोगे आणि कस्टमाइझ करण्याजोगे राहील.

टीएसी सिक्युरिटीच्या ईएसओएफ सोल्यूशनने पीसीआय एएसव्ही उत्पादनाबाबत उद्योगक्षेत्रात नवीन मानक स्थापित केला आहे,  अत्याधुनिक पद्धतीने असुरक्षितता जोखणारे, तपशीलवार वार्तांकन करणारे आणि कृतीयोग्य माहिती देणारे एक सर्वसमावेशक व प्रगत साधन याद्वारे पुरवले जाते. हे सोल्यूशन कंपन्यांना त्यांच्या पेमेंट कार्ड प्रणालींबाबत आजवर कधीही मिळाली नव्हती एवढी दृश्यमानता देते, चुकीच्या हेतूने काम करणाऱ्यांद्वारे कंपनीची फसवणूक होण्यापूर्वीच असे घुसखोर ओळखण्याची व असुरक्षिततांवर मात करण्याची क्षमताही कंपन्यांना यामुळे मिळते.

पीसीआयसोबत एएसव्ही म्हणून (अॅप्रुव्ह्ड स्कॅनिंग व्हेण्डर) म्हणून काम करत असलेल्या जगभरातील ७९ कंपन्यांपैकी केवळ दोन भारतीय मूळ असलेल्या आहेत आणि टीएसी सिक्युरिटी त्यातील एक आहे. उद्योगक्षेत्राच्या या मान्यतेतून कंपनीचे कौशल्य तसेच जागतिक दर्जाची सुरक्षितता उत्पादने पुरवण्याप्रती असलेले समर्पण दिसून येते.


Back to top button
Don`t copy text!