स्थैर्य, दि.४: ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. ब्रिटनमधून परतलेल्या राज्यातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ब्रिटनमधून परतलेल्या या 8 प्रवाशांपैकी 5 जण मुंबईतील असून पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. सध्या या सर्वांना विलगीकरणात ठेवले असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.