दैनिक स्थैर्य । दि.२६ मार्च २०२२ । कोरेगाव । कोरेगाव तालुक्यातील वर्णे गावाचा रस्ता आमदार फंडातून कॉंक्रिटीकरण करण्यात आला आहे मात्र हा रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने हा रस्ता पुन्हा दुरुस्त करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी लाक्षणिक उपोषण केले . हा रस्ता तत्काळ दुरूस्त न झाल्यास त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
आज शुक्रवारी वर्णे गावातील ग्रामस्थ राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याचे झालेल्या निकृष्ट कामाच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले आहे. शासनाने पैसे देऊन देखील शासनाच्या पैशाचा या रस्त्यामध्ये गैरवापर केलेला आहे त्यामुळे या कामाची व संबंधित शासकीय अधिकारी यांची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काळया यादीमध्ये टाकण्यात यावे व यामध्ये दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
दरम्यान या संदर्भात संबंधित विभागाला रस्ता दुरुस्त करण्यासाठी आठ दिवसाची मुदत देण्यात आली होती मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज शुक्रवारी 25 तारखेला आम्ही वर्णें गावातील ग्रामस्थ सहित एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आला बसलो असल्याचे रमेश उबाळे यांनी यावेळी सांगितले.