दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२१ । वाई । वाई, ता. राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकाराने उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ठ्र बंदचे आवाहन केले होते, त्या बंदला विरोध करण्यासाठी वाईतील भाजपने प्रतीकात्मक आंदोलन करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कसे शेतकरी विरोधी असून त्यांचे आंदोलन म्हणजे शेजाऱ्याला झालेल्या आजारा साठी स्वतः औषध घ्यायचे असे असल्याचे सांगत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाआघाडीच्या निषेधार्थ दोन तास आंदोलन केले. यावेळी, उध्दवा अजब तुझे सरकार, असे म्हणत कार्यकर्त्यांनी महाआघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या, भाजपच्या मते राज्यात एवढ्या भयंकर घटना या दळभद्री सरकारमुळे घडलेल्या आहेत, कि महराष्ट्र रोजच बंद ठेवावा लागेल, महिलांवरील अत्याचार, साधुसंतांना ठेचून मारणे, मावळ येथील शेतकरी आंदोलनावर झालेला गोळीबार, प्रचंड भ्रष्ठाचारामुळे राज्यातील मंत्रीच गायब होतात, त्याचे समर्थन उध्दव ठाकरे करतात, अतिवृष्ठीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक दमडाही न दिलेले सरकार राज्यात मात्र शेतकऱ्यांचा फुकटचा कळवळा आणू पाहत आहे, बंदचे आवाहन करून व्यापार्यांसह सर्वसामान्य जनतेला वेठीस धरीत आहे. परंतु, जनता सबकुछ जाणती है, याचे उत्तर निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही याची नोंद भ्रष्ठ तीघाडी सरकारने घ्यावी असेही यावेळी नमूद करीत, आज पुकारलेल्या आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपचे सरचिटणीस सचिन घाटगे, सातारा चिटणीस यशवंत लेले, शहराध्यक्ष राकेश फुले, काशिनाथ शेलार, ओबीसी जिल्हा सर चिटणीस मनोज कदम,मनीषाताई घैसास, डॉ. अस्मिता सनकी, जिल्हा उपाध्यक्ष सागर पवार, रामदास खरात, तुषार सुळके, गुलाब डोंगरे, नरेंद्र महाजन, सचिन थिटे, विजय विभूते, अजय कामटे, समीर पटवेकर व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.