दैनिक स्थैर्य | दि. १७ जानेवारी २०२५ | फलटण |
मकर संक्रांतीनिमित्त फलटण येथील स्वराज फाऊंडेशनतर्फे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वराज फाऊंडेशनतर्फे मलठण येथे हळदी कुंकू समारंभात सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, सौ. मनीषा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते महिलांना हळदी-कुंकू लावण्यात आले. यावेळी मलठण येथील शेकडो महिला उपस्थित होत्या.