
स्वामी विवेकानंदांना अपेक्षित युवक चेहऱ्यावर तेज, देहामध्ये शक्ती, मनात उत्साह, बुद्धीत विवेक, ह्दयात करुणा, मातृभूमी व मातृभाषा प्रेम, इंद्रियांवर संयम, आत्मविश्वास, धाडस, निर्भय, व्यसनमुक्त, मानवता, गुरुजनांचा आदर, चारित्र्य शुद्ध, आचार, विचार, विहार व तेजस्वी असावा.
आज घराघरांत शिवाजी महाराज व विवेकानंद हवे असतील तर जिजाऊ पहिल्यांदा जपल्या पाहिजे. जिजाऊचे संस्कार, शिकवण, आचरण प्रत्येक घरात रुजल्यास भावी पिढी निश्चितच कार्यक्षम होईल. आजच्या युवकाला दिशादर्शक मार्गदर्शकाची निंतात गरज आहे. भरकटत चाललेल्या युवा पिढीने प्रसार माध्यम, ऐषाराम, प्रलोभन, व्यसन, संगत, झटपट श्रीमंतपणा यापासून दूर राहून स्वशिरावर कष्ट करुन जीवन जगल्यास कुणापुढं हात पसरावे लागणार नाहीत.