
-
प्रसिद्ध ‘स्वागत कोल्ड्रिंक्स’च्या शेख बंधूंचा राजे गटाला रामराम
-
व्यापारी वर्गाचा पाठिंबा वाढल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर गटाची ताकद वाढली
-
प्रभाग ७ मध्ये कुंभार कुटुंबियांच्या प्रवेशाने अशोकराव जाधवांची बाजू भक्कम
स्थैर्य, फलटण, दि. 25 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज शहराच्या व्यापारी वर्गातील प्रतिष्ठित नाव असलेल्या ‘स्वागत कोल्ड्रिंक्स’च्या शेख बंधूंनी आणि प्रभाग क्रमांक ७ मधील कुंभार कुटुंबियांनी राजे गटाची साथ सोडत महायुतीत (भाजपा-राष्ट्रवादी) जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे व्यापारी वर्ग आता खासदार गटाच्या (रणजितसिंह नाईक निंबाळकर) पाठीशी उभा राहत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
व्यापारी वर्गाचा मोठा पाठिंबा
शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि ‘स्वागत कोल्ड्रिंक्स’चे संचालक बंधू शगीर शेख, समीर शेख, अश्फाक शेख, अब्दुल रशीद शेख, मजहर शेख, मोहम्मदअली शेख, अब्दुलमलिक शेख, आदिल शेख, अब्दुलहमीद शेख, अब्दुल्ला शेख, फारुख शेख आणि आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. त्यांच्यासोबतच अमोल सस्ते, राहुल निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर आणि रियाज इनामदार यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती. दिग्गज व्यापाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका निवडणुकीच्या तोंडावर राजे गटासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
प्रभाग ७ मध्ये कुंभार कुटुंबियांची साथ
दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ७ मध्येही भाजपची ताकद वाढली आहे. या प्रभागातील गजानन कुंभार, गोरख कुंभार, विजय कुंभार, सुरज कुंभार, अमोल कुंभार आणि महादेव कुंभार यांनी भाजप परिवारात जाहीर प्रवेश केला. प्रभाग क्रमांक ७ चे भाजपचे उमेदवार आणि माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
मान्यवरांची उपस्थिती
या दोन्ही प्रवेश सोहळ्यांना भाजप नेते तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे पक्षात स्वागत केले.

