स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साताऱ्यात धरणे आंदोलनं; वाढीव वीज बिल धोरणांचा केला निषेध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । सातारा । स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी महावितरणकडून आकारण्यात येणाऱ्या जादा वीज बिल धोरणाच्या विरोधात कृष्णानगर येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी नंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

कोल्हापूर येथे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महावितरण विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ, अन्यायकारक वीजबील वसुलीच्या विरोधात, खोटी बीले रद्द करणेसाठी व दिवस १० तास अखंडीत वीज मिळवण्यासाठी बेमुदत ठीय्या आंदोलन महावितरण कार्यालय कोल्हापुर येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठींबा म्हणून व सरकारने नुकताच घेतलेला एफआरपीचे दोन तुकडे करणाऱ्या शासन निर्णयाचा जाहीर निषेध म्हणून सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृष्णानगर येथील महावितरण कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केलंय.

यावेळी आंदोलनकर्ते कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडून बसल्याने पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला बसण्याची विनंती केली. मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसानी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं.
महावीतरणकडुन वीजपुरवठा खंडीत करण्याचा सपाटा चालु आहे.त्यामूळे शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे याचा आंदोलन कर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन निषेध केला

यावेळी राजू शेळके,जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना,जिल्हाध्यक्ष पुर्व धनंजय महामुलकर,राज्य कार्यकारणी सदस्य अर्जूणराव साळूंखे,सातारा तालुका अध्यक्ष रमेश पीसाळ,फलटण तालुका उपाध्यक्ष शकील मणेर,राजु घाडगे,उमेश घाडगे,दत्तात्रय पाटील,सुधाकर केसुगडे,संदीप घाडगे,रणजीत बागल,रामचंद्र मोरे,सुभाष नलावडे,जेष्ठ नेते मूरलीधर गायकवाड,बाळासाहेब गायकवाड,हेमंत मोरे,जनार्दण आवारे,निलेश भोसले, हेमंत खरात व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!