स्थैर्य, सातारा, दि. 24 : कोवीड-19च्या अनुषंगाने रोजजिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचा मोर्चा काढून गर्दी जमवून भंग केल्याप्रकरणी स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह 40 ते 45 जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, कोव्हीड-19 च्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक कायदा अन्वये जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. तथापि, बाँबे रेस्टॉरंट ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, रमेश गुलाब पिसाळ रा. नेले, ता. सातारा, अर्जुन सर्जेराव साळुुंखे रा. वनगळ, ता. सातारा, धनंजय महामुलकर रा. फलटण, प्रमोद गाडे रा. पवारवाडी, ता. फलटण, रवींद्र घाडगे रा. चौधरवाडी, ता. फलटण, श्रीकांत लावंड, अनिल पवार रा. खटाव, देवानंद पाटील रा. वाठार, ता. कराड, अमोल सुदाम साळुंखे रा. कारंडवाडी, ता. सातारा यांच्यासह सुमारे 45 जणांवर बेकायदा जमाव जमवून, सामाजिक अंतर न पाळून व तोंडावर मास्क परिधान करता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हवालदार जाधव तपास करत आहेत.