स्वाभिमानी नाभिक संघटनेचे शुक्रवारी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 12 : सध्या कोरोणा मुळे सर्वत्र कोरोणा विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी जास्त संसर्ग होण्याची भीती आहे असा सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे सलून  व  व ब्युटी  पार्लर  फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने शुक्रवार दि. १२ रोजी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देणार असल्याची माहिती स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रकाश सुरमुख यांनी दिली.

यासंदर्भात त्यांनी दिलेली माहिती या प्रमाणे – सध्या संपूर्ण देशभरात सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नाभिक समाजावर आर्थिक संकट आले आहे. यासंदर्भात सलून  व ब्युटी पार्लर च्या मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांना शुक्रवार दि. १२ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य  यांच्या वतीने दिले जाणार आहे. तसेच सोमवार दि. १५ रोजी सदर निवेदन प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १२  रोजी सातारा येथे सकाळी ११वांजता °स्वाभिमानी नाभिक …संघटना महाराष्ट्र  राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष श्री शंकरराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व आदेशानुसार राज्य कार्यकारणी, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी व सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या व तालुका कार्यकारणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन  दिले जाणार आहे. तरी स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येते उपस्थित राहावे असे आवाहन  स्वाभिमानी नाभिक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष  आधिकराव चव्हाण यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!