दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२४ | बारामती |
बारामती औद्योगिक वसाहत येथील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये आयएसएमटी कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक २०२४-२०२७ साठी उत्साही वातावरणात पार पडली. या निवडणुकीत स्वाभिमानी कामगार पॅनल प्रचंड बहुमताने विजयी झाले.
निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार –
अध्यक्ष – कल्याण कदम, उपाध्यक्ष -शिवाजी खामगळ, जनरल सेक्रेटरी-गुरुदेव सरोदे, खजिनदार- नानासो भगत, सदस्य – सुरेश दरेकर, हनुमंत बाबर, प्रकाश बरडकर, संजय कचरे, आप्पासो होळकर.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी अतुल कोटांगळे – ईआर हेड, विशाल शिंदे, राकेश आवटे, रमेश दरेकर, पांडुरंग दिवेकर, शहाजी बाबर, प्रकाश जाधव, सतीश मासाळ, राजेंद्र भुंजे, हेमंत सोनवणे, अनिल भिसे, सुनील सुतार, कानिफनाथ साळुंखे, गौतम मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विजयी झालेल्या उमेदवारांचे कामगार बंधूंनी अभिनंदन केले.
कामगारांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे विजयी झाल्यानंतर अध्यक्ष कल्याण कदम यांनी यावेळी सांगितले.