
GST २८% वरून १८% झाल्याने ग्राहकांना मोठा फायदा; नवरात्री-दसर्यासाठी आगाऊ नोंदणीचे आवाहन
स्थैर्य, फलटण, दि. ११ सप्टेंबर : शासनाने दुचाकींवरील वस्तू व सेवा कर (GST) २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणल्याने, सुझुकी कंपनीच्या लोकप्रिय दुचाकींच्या किमतीत मोठी घट होणार आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार असले तरी, फलटण येथील अधिकृत विक्रेते ‘गजानन सुझुकी’ येथे नवीन दरांनुसार आगाऊ बुकिंगला सुरुवात झाली आहे.
या जीएसटी कपातीमुळे ग्राहकांना वाहनाच्या मूळ किमतीवर जवळपास १० टक्क्यांचा फायदा होणार आहे. सुझुकी एक्सेस, सुझुकी बर्गमन, सुझुकी ॲव्हेनिस, सुझुकी जिक्सर आणि सुझुकी व्ही-स्ट्रॉम यांसारख्या ग्राहकांच्या पसंतीच्या गाड्यांच्या किमती कमी होणार आहेत.
आगामी नवरात्री आणि दसरा सणांच्या मुहूर्तावर गाडी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी, वाढती मागणी लक्षात घेता आपल्या पसंतीचे मॉडेल आणि रंग वेळेवर मिळवण्यासाठी आताच नोंदणी करावी, असे आवाहन ‘गजानन सुझुकी’तर्फे करण्यात आले आहे.
“शोरूममध्ये बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना स्टॉक उपलब्धतेनुसार आणि प्रतीक्षा यादीप्रमाणे, आरटीओ पासिंग करून आणि एचएसआरपी नंबर प्लेटसह दुचाकी सुपूर्द केली जाईल,” अशी माहिती ‘गजानन सुझुकी’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन शेळके यांनी दिली.

