शिवाजीराजे कृषी महाविद्यालयात ‘शाश्वत शेती दिन’ उत्साहात साजरा

हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना जयंतीनिमित्त अभिवादन


स्थैर्य, फलटण, दि. ०७ ऑगस्ट : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय येथे हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस ‘शाश्वत शेती दिन’ व ‘कृषी पदवीधर दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी डॉ. स्वामिनाथन यांच्या संशोधनामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाल्याचे सांगितले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी शाश्वत शेतीचे महत्त्व आणि अन्न सुरक्षेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एन. एस. ढाल्पे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. एस. पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. जी. बी. अडसूळ यांनी केले. कार्यक्रमासाठी कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!