फलटणमधील अतिक्रमण हटाव मोहिमेस स्थगिती; जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश


दैनिक स्थैर्य । दि. ०५ जानेवारी २०२३ । फलटण । गेले काही दिवसांपासून फलटण शहरामध्ये जी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, ती मोहीम सहाय्यक संचालक नगरचना, सातारा यांनी अतिक्रमणाचा सर्वे करून अतिक्रमणे अधोरेखित केल्याशिवाय अतिक्रमणे काढण्यात येऊ नयेत. तसेच तोपर्यंत चालू असलेली अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबवण्यात यावी असे आदेश सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिलेले आहेत.


Back to top button
Don`t copy text!