स्थैर्य, फलटण, दि. ११ : फलटण नगर परिषदेच्या महावीर स्तंभ येथे होत असलेल्या “राजधानी टॉवर्स” या इमारतीमध्ये संबंधित गाळाधारकाच्या फायद्यासाठी बेकायदेशीर पणे बदल केलेले आहेत. हे बदल स्थायी समितीच्या ठरावाद्वारे करण्यात आलेले आहेत, अशी माहिती नगरपालिका प्रशाशन देत आहे. तरी “राजधानी टॉवर्स” येथे बेकायदेशीरपणे बदल करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली म्हणून नगराध्यक्षा तथा स्थायी समितीच्या अध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे व स्थायी समितीच्या त्या मिटिंग मध्ये उपस्थित असलेले सदस्य यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.
“राजधानी टॉवर्स” येथे बेकायदेशीर बदल करण्यास फलटण नगर परिषदेच्या स्थायी समितीने परवानगी दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी माहिती नगरसेवक अशोकराव जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी नगरसेवक सचिन अहिवळे उपस्थित होते.