दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । सातारा । सातारा शहरातील सदर बाजार , पोवई नाका तसेच इतरत्र ठिकाणी बोकाळलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात दिशा विकास मंच अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे . सातारा शहरातील विकास कामे जी कॉन्ट्रॅक्टर करत नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे
यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन सादर केले आहे या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की सातारा शहरातील 100 अनधिकृत बांधकामांना 52 53 च्या नोटिसा बजावल्या गेल्या आहेत मात्र ती अतिक्रमणे पाडण्यात आलेली नाहीत . रविवार पेठ मध्ये उभारण्यात आलेल्या विनापरवाना खोक्यांवर सुद्धा अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही सदर बाजार येथील पृथ्वी डेव्हलपर्स परिमल सोसायटी सदर बाजार, इत्यादी ठिकाणी बांधकामाच्या संदर्भात वेळोवेळी तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याने प्रशासनाचा सुस्तपणा दिसून येत आहे .
काँग्रेस कमिटी ,एसटी स्टँड परिसर राजवाडा, मोती चौक, साईबाबा मंदिर चौक रोड इत्यादी ठिकाणी चायनीज गाडयांचा सुळसुळाट झाला आहे प्रशासनाने जी अधिकृत हातगाडीवाले यांची यादी प्रसिद्ध केली होती ती यादी कायम ठेवून बाकी सर्व टपऱ्या तातडीने हटवण्यात येणे गरजेचे आहे मात्र संघटनेच्या नावाखाली अनेक जण टपऱ्या काढून पालिकेच्या जागेवर परस्पर कमाई करत आहेत साईबाबा मंदिर चौकातील पानपट्टी , विलासपूर येथील अतिक्रमण लोकप्रतिनिधींच्या नावाखाली प्रशांत निकम हे कारवाई करण्याची टाळाटाळ करतात .
मंडई होर्डिंग , मोकळ्या जागा यांच्याकडून मिळणारा महसूल असतानाही पालिकेच्या तिजोरीत किती रक्कम जमा होते यावर सखोल संशोधन व्हावे आणि तातडीने प्रशांत निकम यांची बदली करण्यात यावी अशी मागणी सुशांत मोरे यांनी केली आहे सातारा शहरातील विकास कामे सुद्धा अत्यंत मंद गतीने सुरू आहेत ती कामे वेळेत पूर्ण करणाऱ्या ठेकेदारांना काळे यादी टाकले जावे अशी सुशांत मोरे यांनी मागणी करत जोपर्यंत या मागण्यांचा गांभीर्याने विचार होत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.