
दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । मुंबई । सूर्या रोशनी या भारतातील आघाडीच्या फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गूड्स (एफएमईजी) कंपनीने यंदा उन्हाळ्यामध्ये प्रखर उकाड्याच्या वाढत्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नुकतेच त्यांच्या पंख्यांच्या आकर्षक श्रेणीची नवीन सीझन सिरीज: डिवाईन, अमेझ, ग्रेस व ज्वेल लाँच केली आहे. या नवीन सिरीजमध्ये १२०० मिमी ब्लेड स्वीप आहे, जे ४०० आरपीएमची हाय-स्पीड कार्यक्षमता देण्यासोबत फक्त ७२ वॅट वीजेचा वापर करते. नवीन सिरीजची किंमत सब-२००० रूपयांच्या श्रेणीमध्ये आहे आणि सूर्या रोशनीच्या लोकप्रिय पैशाचे मोल देणा-या ऑफरिंग्जशी पूरक असेल.
विशेषत: भारतातील कडक ऊनापासून दिलासा देण्याकरिता डिझाइन करण्यात आलेल्या पंख्यांची नवीन श्रेणी सूर्या रोशनीच्या आरअॅण्डडी टीमने स्वदेशी विकसित केली आहे आणि आजच्या आधुनिक व अत्याधुनिक ग्राहकांसाठी सानुकूलरित्या डिझाइन करण्यात आली आहे. या श्रेणीमध्ये उच्च दर्जाची कार्यक्षमता व आकर्षकतेचे अद्वितीय संयोजन आहे. सूर्या रोशनीच्या सिलिंग पंख्यांमध्ये अद्वितीय अँटी-बॅक्टेरिया व अँटी-डस्ट तंत्रज्ञान आहे. ते तेल-रोधक व ओलावा-रोधक असण्यासोबत ओरखडे व डाग रोधक आहेत.
सूर्या रोशनीच्या कन्झ्युमर ड्युरेबल्सचे व्यवसाय प्रमुख विशाल अखौरी म्हणाले, “आम्हाला पंख्यांच्या चार नवीन उदयोन्मुख श्रेणी लाँच करण्याचा आनंद होत आहे, ज्यामधून आमच्या ब्रॅण्डची उत्तम डिझाइन व उच्च दर्जाप्रती स्थिर कटिबद्धता दिसून येते. यामुळे ग्राहकांमध्ये सर्वात पसंतीचा ब्रॅण्ड म्हणून आमचे स्थान अधिक प्रबळ होईल. आम्ही तंत्रज्ञान व स्टायलिश आकर्षकतेच्या प्रमुख आधारांवर आधारित नवीन उत्पादने सादर करणे सुरूच ठेवू, ज्यामुळे ग्राहकांच्या मनामध्ये नवोन्मेष्कारी ब्रॅण्ड म्हणून सूर्या रोशनीचे स्थान अधिक दृढ होईल.”
नवीनच लाँच करण्यात आलेले पंखे अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये येतात, जे परिपूर्ण असण्यासोबत अत्याधुनिक ग्राहक व त्यांच्या समकालीन घरांसाठी आकर्षकरित्या डिझाइन करण्यात आले आहेत. हे पंखे अनेक रंगांच्या पर्यायांसह अँटी डस्ट कोटिंगसह येतात, जे पंख्यांच्या या विभागामध्ये पहिलेच वैशिष्ट्य आहे.