दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । सूर्या रोशनी या भारतातील आघाडीच्या फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गूड्स (एफएमईजी) कंपनीने नुकतेच ३ लिटरपासून ५० लिटरपर्यंच्या स्टोरेज क्षमतांमधील ऊर्जा-कार्यक्षम वॉटर हिटर्सच्या त्यांच्या नवीन मान्सून व विंटर रेडी सिरीजच्या लाँचची घोषणा केली आहे. सर्व हिटर्स मॉडेल्स क्यूबिक्स, स्पीडी आणि इन्स्टा प्रो उच्च गंजरोधक रचनेसह डिझाइन करण्यात आले आहेत आणि या मॉडेल्समध्ये फुली लोडेड ऑफरिंग्ज आणि पहिल्यांदाच मोफत इन्स्टॉलेशन व अॅक्सेसरीज सपोर्ट आहे.
सुरक्षितता, आरोग्य व आंघोळीचा आनंद यावर लक्ष केंद्रित करण्यासोबत आधुनिक व समकालीन बाथरूमच्या सजावट आणि आतील भागांना उत्तम प्रकारे पूरक करण्यासाठी नवीन सिरीज डिझाइन करण्यात आली आहे. नवीन सिरीज विभक्त कुटुंबांच्या विशिष्ट आवश्यकता आणि त्यांच्या जागेच्या मर्यादांचे देखील निराकरण करते.
सूर्या रोशनीच्या कंझ्युमर ड्यूरेबल्सचे व्यवसाय प्रमुख विशाल अखौरी म्हणाले, “आम्हाला वॉटर हिटर्सचे तीन नवीन उदयोन्मुख मॉडेल्स लाँच करण्याचा आनंद होत आहे, जे आमच्या ब्रॅण्डची उत्तम डिझाइन व उच्च दर्जाप्रती स्थिर कटिबद्धतेला दाखवतात. ही मॉडेल्स ग्राहकांमधील सर्वात पसंतीचा ब्रॅण्ड म्हणून आमचे स्थान अधिक दृढ करतील. आम्ही तंत्रज्ञान व स्टायलिश आकर्षकतेच्या प्रमुख आधारस्तंभांवर आधारित नवीन उत्पादने सादर करत राहू, ज्यामधून सूर्या रोशनीचे ग्राहकांच्या मनामध्ये नवोन्मेष्कारी ब्रॅण्ड म्हणून स्थान अधिक प्रबळ होईल.”
कंपनीचे ५-स्टार गुणवत्ता प्राप्त क्यूबिक्स ऊर्जा कार्यक्षम-उच्च दर्जाचे पीयूएफ इन्सुलेशन आणि निकेल-कोटेड हेवी कॉपर हिटिंग एलिमेंटसह येते, जे उच्च उष्णता टिकवून ठेवण्याची खात्री देते, वीज बिल कमी करते. पॉलिमर-कोटेड हेवी डस्टी स्टील टँक उच्च तापमानातही गंज आणि ऑक्सिडेशन प्रतिरोध देते. हा वॉटर हिटर १० लिटर, १५ लिटर आणि २५ लिटर क्षमतेमध्ये येतो. स्पीडी या इन्स्टण्ट इलेक्ट्रिक वॉटर हिटरमध्ये शॉक-प्रूफ व गंजरोधक उच्च–प्रतिरोधक पॉलिमर रचनेसह हेवी-ड्युटी स्टीलपासून बनवण्यात आलेले जॉइण्ट-लेस टँक आहे, तसेच दबाव सुसंगता जवळपास ६.५ बार आहे. इन्स्टण्ट प्रो देखील उष्णता रोधकासाठी टिकाऊ गंजरोधक रचनेसह डिझाइन करण्यात आला आहे. या वॉटर हिटरमध्ये उच्च-श्रेणीच्या ३०४ लिटर स्टेनलेस स्टिल टँकसह टँक गळतीची शक्यता कमी करयासाठी आणि दीर्घकालीन टिकाऊपणासाठी सिंगल वेल्ड लाइन आहे.
हे वॉटर हिटर्स इलेक्ट्रिक घटकांवर जवळपास २ वर्षांच्या दर्जात्मक वॉरंटीसह येतात. तसेच आतील वॉटर टँक क्यूबिक्सवर जवळपास ७ वर्षांच्या, स्पीडीमध्ये ६ वर्षांच्या आणि इन्स्टा प्रोवर ५ वर्षांच्या वॉरंटीसह येते.