
सुरवडी गटातून घाडगेवाडीचे युवा उद्योजक शंभूराज बोबडे यांना पंचायत समितीची उमेदवारी द्यावी, अशी मागणी पश्चिम भागातील गावांतून जोर धरू लागली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १७ जानेवारी : फलटण तालुक्यातील सुरवडी गटातून घाडगेवाडीचे युवा उद्योजक व युवा नेते शंभूराज बोबडे यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी पश्चिम भागातील विविध गावांतून पुढे येत आहे. माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या बोबडे यांच्याबाबत ही मागणी वाढत आहे.
पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरवडी या सर्वसाधारण गणातून शंभूराज बोबडे यांना उमेदवारी द्यावी, असा सूर पश्चिम फलटणमधील गावांतून उमटत आहे. स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.
बांधकाम क्षेत्रात कमी कालावधीतच प्रसाद कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात वेगळी ओळख निर्माण करणारे पैलवान शंभूराज परमेश्वर बोबडे हे युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. विकासकामांचा अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्यामुळे त्यांच्या उमेदवारीची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
घाडगेवाडी परिसरातील दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक दशरथ आबा बोबडे यांच्या कुटुंबाला पश्चिम फलटणमध्ये व्यापक ओळख आहे. दशरथ आबा बोबडे यांचे पुतणे असलेल्या शंभूराज बोबडे यांच्या उमेदवारीसाठी भाजपा व मित्र पक्षांकडूनही आग्रही भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
बोबडे कुटुंबाचे पश्चिम भागातील अनेक गावांशी घराघरात संबंध असून, हे कुटुंबीय अनेक वर्षे फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे सुरवडी गणातून शंभूराज बोबडे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी घाडगेवाडी परिसरातून जोर धरत आहे.
