
दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । सातारा । मौजे दरे तर्फ परळी तालुका सातारा येथे संतोष सखाराम जाधव यांच्या मालकीच्या विहिरीत अनावधानाने पडलेल्या चौसिंगा प्रजातीच्या वन्य प्राण्याला सातारा वनविभागाच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. या वन्य प्राण्याला पठारावरील नैसर्गिक आदिवासामध्ये सोडण्यात आले.
दिनांक 28 जून रोजी जाधव यांच्या विहिरीमध्ये चौसिंगा जातीचा प्राणी पडल्याची माहिती सातारा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती जाधव यांना मिळाली होती. यावेळी वनपाल अरुण सोळंकी, वनरक्षक साधना राठोड, अशोक माले, मयुर गुजर, शेखर चव्हाण, अभिषेक जाधव, सुहास मोरे, लोकेशन रेस्क्यू चॅरीटेबल ट्रस्टचे अमित तोडकर नरेश चांडक नितीन श्रीकुमार यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा अंदाज घेतला आणि जाळी च्या साह्याने चौसिंगा मादी जातीच्या वन्य प्राण्यांना सुरक्षित विहिरीच्या बाहेर काढले व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
त्यानंतर त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडून देण्यात आले अनुसूची एक मधील अत्यंत महत्त्वाचा वन्यप्राणी असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे या दुर्मिळ प्राण्यांची प्राण वाचवता आले कोणत्याही वन्य प्राणी जखमी अथवा अडचणी काढून आल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांनी केले आहे या संदर्भात उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी संबंधित नागरिकांचे आभार मानले.