स्थैर्य, म्हसवड, दि. ०४ : म्हसवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सापडलेला 58 वर्षीय सायकलचे स्पेअर पार्ट डिलर व त्यानंतर त्याच्याच घरात सापडलेले पांच पॉजिटिव रुग्णामुळे म्हसवड सह परिसर हादरुन गेला असुन आजुन म्हसवडकरांच्या मनात धाकधूक सुरु असुन या कुटुंबात बाधीत झालेल्याचा मुलगा डॉक्टर व त्याची (सुन) पत्नी यांचे क्लिनीक असुन त्या मध्ये झालेल्या ओपीडीत पंधरा दिवसात शंभरच्या दरम्यान रुग्ण आपली तपासणी करुन घेतली आहे त्या सर्वाचा आरोग्य केंद्र सर्वे करुन त्यांचा स्वैब तपासणी साठी पाठवण्यात येणार असल्याने त्या रिपोर्ट कड़े म्हसवडकरांचे लक्ष लागले आहे
बुधवार दिनांक 1 जुलै रोजी दुपारी त्याच घरातील 65 वर्षीय पुरुष, त्यांचा 50 भाऊ (पुरुष) त्यांची 11 वर्षीय मुलगी, तर परवा पॉजिटिव झालेले 58 वर्षी पुरुषाचा 27 वर्षीय डॉ मुलगा व त्याची 26 वर्षीय डॉ पत्नी असे पाच बाधीत सापडले होते त्यांच्या घरी भांडी व स्वयंपाक करणरी महिला दहा ते बारा घरी काम करत असल्याने अनेकांच्या मनाते भिती त्या महिलेची होती मात्र ती महिला निगेटिव निगाली त्यानंतर कपड़े धुणारी महिलेची हि भिती अनेकांनी घेतली असुन तीच्या प्रमाणे डॉक्टर पती पत्नी यांनी तपासलेल्या , व या कुटुंबाच्या संपर्कातील अनेकांची माहिती जमा करण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे.