
स्थैर्य, दि.१९: कोरोना विषाणू महामारीमध्ये नोकरदार लोकांची बचत ३२ टक्क्यांपर्यंत राहिली. गेल्या वर्षी ही ३८% होती. ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांसाठी आपत्कालीन फंड, वैद्यकीय वा अन्य आवश्यक गरजांसाठी सेव्हिंग सर्वात महत्त्वपूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी असे करणारे केवळ ३२% होते.
फायनान्शियल प्रॉडक्टच्या ऑनलाइन मार्केट प्लस बँक बाजार डॉट कॉमने जुलैमध्ये जारी केलेल्या आपल्या अॅस्पिरेशन इंडेक्स २०२० च्या आधारावर बचतीबाबतचा ट्रेंड जारी केला आहे. या बचत सर्वेक्षणानुसार, मंदी, महारोगराई आणि लॉकडाऊनमुळे लोकांची एकूण बचत घटली आहे. कपात, वेतन कपात आणि काही महिन्यांसाठी सुटीवर पाठवण्यासोबत वाढत्या महागाईमुळे मोठी कपात झाली आहे. असे असताना व्यावसायिक लोकांकडे बचतीसाठी पैशाची कमतरता आहे.
सर्वेक्षणात देशाच्या १२ शहरांतील सुमारे १,८२८ नोकरदार पुरुष व महिलांचा समावेश होता. २२ ते ४५ वयोगटातील वर्गातील या लोकांकडून कमाईनंतर त्यांचा खर्च आणि बचतीबाबतच्या सवयी जाणून घेतल्या.
प्रवास, लक्झरी खर्च टाळला जातोय
नोकरीतील अनिश्चिततेमुळे लोक लक्झरी आणि प्रवासावरील खर्च टाळत आहेत. या वर्षी ७० टक्के लोक इमर्जन्सी फंड तयार करत आहेत. गेल्या वर्षी ३२ टक्के असे करणारे होते. ७० टक्के लोक अचानक येणाऱ्या खर्चांच्या बचतीवर भर देत आहेत. ६० टक्के लोक जीवनस्तर सुधारण्यासाठी आणि ४७ टक्के मुलांसाठी आणि निवृत्तीसाठी बचत करत आहेत.
सर्वेक्षणातील बचतीचा ट्रेंड
कोरोनाच्या या संकटात नोकरदार लोकांची बचत ३२ टक्के राहिली. बचत करणाऱ्यांमध्ये अर्ली जॉब्ज म्हणजे नवीन नोकरी सुरू करणारे सर्वात पुढे आहेत. नव्या नोकरीत २२-२७ वयोगट, मनी मूनर्समध्ये २८-३४ वर्षे आणि वेल्थ वॉरियर्समध्ये ३५-४५ वयाच्या नोकरदार पुरुष आणि महिलांचा समावेश आहे.