मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती उत्तम


दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ.अजित देसाई आणि डॉ.शेखर भोजराज यांनी दिली आहे.

या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ.अजित देसाई हे हृदयरोग तज्ञ असून डॉ.शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.


Back to top button
Don`t copy text!