दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । सातारा । सातारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले व गेंडामाळ येथील अंजली कॉलनीतील रहिवासी सुरेश शंकर शिंदे ( वय ८५ ) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी संगम माहुली येथे कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. . त्यांच्या मागे पत्नी मुलगा सुनील , विवाहित मुलगी , सून , जावई , नातवंडे असा परिवार आहे. सुरेश शिंदे यांच्या कुटुंबीयातील चौथी पिढी सार्वजनिक बांधकाम विभागात सेवेत होती. सुरेश शिंदे यांनी मनमिळावू स्वभावामुळे मोठा मित्रपरिवार जमवला होता.