सुप्रिया सुळे यांची साताऱ्याला धावती भेट ; ज्येष्ठ साहित्यिक आ.ह. साळुंखे यांच्याशी तासभर चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ एप्रिल २०२२ । सातारा । राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना साताऱ्यात धावता दौरा केला शाहूपुरी येथील ज्येष्ठ साहित्यिक आ ह साळुंखे यांची त्यांच्या निवासस्थानी सुप्रियाताईंनी भेट घेऊन सुमारे सव्वा तास त्यांच्याशी चर्चा केली यावेळी आ ह साळुंखे यांचे चिरंजीव राकेश साळुंखे उपस्थित होते मात्र या तासाभराच्या सातारा शहरातील दौऱ्यात सुप्रिया त्यांनी कोणतेही राजकीय वक्तव्य करणे कटाक्षाने टाळले .

सुप्रिया सुळे यांचा कराड आणि कोल्हापूर दौरा निश्‍चित झाला होता या दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार सकाळी दहा वाजता त्यांनी सातारा शहरात येऊन शाहूपुरी येथील ज्येष्ठ साहित्यिक आ ह साळुंखे यांची भेट घेतली या भेटीमध्ये त्यांनी आ ह साळुंखे यांच्या साहित्यकृती वाचलेले संदर्भ आवडलेले पुस्तक आणि त्या साहित्यातील संदर्भाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर सुमारे सव्वा तास चर्चा केली या चर्चेचा रोख हा संपूर्णपणे साहित्याशी संबंधित होता

सुप्रिया सुळे या साताऱ्यात आल्याचे समजताच पत्रकारांनी त्यांना आ ह साळुंखे यांच्या निवासस्थानी गाठलेच मात्र पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना सुप्रियाताई यांनी अत्यंत चलाखीने टोलवले राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेची यशस्विता ,महा विकास आघाडी वर भाजपचा सातत्याने सुरू असलेला हल्लाबोल, सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर ईडीने कारवाई का करू नये या संदर्भात किरीट सोमय्या यांनी केलेले वक्तव्य, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाच्या संदर्भात केलेले वक्तव्य या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सुप्रिया सुळे यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला मात्र सुप्रिया ताई मी हे सर्व प्रश्न कटाक्षाने टाळले त्या म्हणाल्या ज्येष्ठ साहित्यिक आ ह साळुंखे यांचा व माझा परिचय फार पूर्वीपासून आहे त्यांच्या साहित्याची मी पहिल्यापासून प्रशंसक आणि वाचक आहे तात्यांचा नवनवीन साहित्यकृतींची मी नेहमीच माहिती घेत असते .या दौऱ्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता या भेटीमध्ये मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून साहित्य संदर्भाच्या अनुषंगाने चर्चा केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले


Back to top button
Don`t copy text!