खा श्री छ उदयनराजे भोसले समर्थक व कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट


दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । कराड । कराड शहराच्या विविध विकास योजनांवर चर्चा करणेसाठी पालिकेतील सत्तारुढ यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व गटनेते नगरसेवक राजेंद्रसिह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

श्री.राजेंद्रसिह यादव यांनी आपल्या सत्तेच्यात गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत झालेल्या विकास कामांची माहीती दिली. विशेषत: स्वच्छ सर्वेक्षणमधे सातत्याने देश पातळीवर झालेल्या गौरवाबाबत त्यांनी आनंद व्यक्त करुन कराड नगर परिषदेने योग्य नियोजनाने केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तसेच कराड शहराच्या नियोजित विकास कामांची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यांनीही लक्षपुर्वक समजुन घेवुन काही उपयुक्त सुचना देवुन कराड शहराच्या विकास कामात शासन तुमच्या खंबीरपणे पाठीशी राहील याची ग्वाही दिली.

यावेळी राजेंद्रसिह यादव यांनी त्यांचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल यथोचित सत्कार करुन कराडला भेट देण्याची विनंती केली. ती त्यांनी तत्काळ मान्य करुन मुख्यमंत्री पदाची जराबदारी स्विकारल्यावर पुढील आठवड्यात मी प्रथमच सातारा जिल्हा दौर्‍यावर येत असुन या दौर्‍यातच मी कराडला येणार असे अश्वासन दिले.


Back to top button
Don`t copy text!