
दैनिक स्थैर्य । दि. २८ मार्च २०२३ । बारामती । एसटी महाराष्ट्राची वाहतूक वाहिनी आहे अनेक जण विविध पदावर ,विविध क्षेत्रात आहेत ते एसटी च्या प्रवासामुळे शिक्षण घेतल्याने यशस्वी आहेत त्यामुळे सद्याच्या काळात सुद्धा एसटी च्या विविध सेवा व सुविधांचा लाभ घ्या व एसटी ने प्रवास करा असे आवाहन एसटी च्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे .
माळेगाव खुर्द येथे प्रवासी वाढवा अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात एसटी चे आगार व्यवस्थापक रवींद्र कुंभार, वाहतूक अधीक्षक घन:श्याम शिंदे, वाहतूक निरीक्षक हनुमंत भोसले, विकास सावंत, वाहतूक नियंत्रक राजेंद्र काटे एसटी कामगार संघटना सचिव राजेंद्र भोसले, चालक तानाजी डोंबाळे व माळेगाव खुर्द चे सरपंच बाळासाहेब काटे, ग्रामपंचयात सदस्य शहाजी शिर्के, माळेगाव कारखाना चे माजी उपाध्यक्ष चिंतामणी नवले, माजी संचालक संजय काटे, संभाजी काटे व हेमंत काटे,चंद्रकांत सस्ते आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्तीत होते.
महिला प्रवासी यांना फक्त ५०% तिकीट, अंध, अपंग, विद्यार्थी, खेळाडू, स्वातंत्र सैनिक शहीद वीर पत्नी वीर माता आदींना देत असलेल्या सवलती याची माहिती देऊन गावातून तीर्थक्षेत्र साठी जावयाचे असल्यास बस उपलब्ध करून दिली जाईल, सहल, विविध कार्यक्रम साठी पाहिजे त्या ठिकाणी बस बाजार भावा पेक्षा कमी दरात उपलब्ध देऊ व आरामदायी, स्वछता, सुखकर प्रवासासाठी कटिबद्ध असल्याचेही एसटी च्या वतीने अधिकारी वर्गाने ग्वाही दिली.
राज्याच्या विकासात एसटी चा सहभाग महत्वाचा असल्याने एसटी ने प्रवास करू व उत्त्पन्न वाढीसाठी मदत करू असेही ग्रामस्थांनी सांगितले. सूत्रसंचालन राजेंद्र काटे व आभार प्रदर्शन राजेंद्र भोसले यांनी केले.