
स्थैर्य, फलटण, दि. २५ नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग गुंजवटे आणि श्रीमती श्रीदेवी कर्णे यांच्या प्रचाराला आता चांगला वेग आला आहे. दोन्ही उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत.
त्यांनी मतदारांना स्पष्ट आवाहन केले आहे की, आपल्याला फलटण शहर दहशतमुक्त करायचे आहे. यासाठी नागरिकांनी पुढे यावे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सुसंस्कृतपणा जपण्यासाठी मतदारांनी शिवसेनेला साथ द्यावी, असे आवाहन ते करत आहेत. शांतता आणि सुरक्षितता हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे.
गुंजवटे आणि कर्णे यांचे प्रयत्न शांतता आणि विकास याभोवती केंद्रित झाले आहेत. प्रभाग ७ च्या नागरिकांनी श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्यावे, अशी त्यांची विनंती आहे.

