लोकशाहीला गिळंकृत करू पाहणार्‍या राक्षसी राजवटीचा नायनाट करण्यासाठी प्रा. आढाव सरांना साथ द्या – राजू शेट्टी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण विधानसभा निवडणुकीसाठी उभे असलेले संविधान समर्थन समिती पुरस्कृत परिवर्तन महाशक्तीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार प्रा. रमेश आढाव यांना फलटण तालुक्यातील सर्व मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

फलटण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजू शेट्टी शुक्रवारी फलटण येथे प्रा. रमेश आढाव यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार तथा ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर उपस्थित होते.

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला आदर्श संविधान दिले आहे. या संविधानाला अभिप्रेत असा आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे ज्वलंत उदाहरण म्हणले आढाव सर आहेत. फलटण तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सामान्य माणूस किंवा मध्यमवर्ग व स्त्रिया असू द्या, यांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न विधानसभेत मांडण्याचे काम प्रा. आढाव सरांच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला ‘मत’ नावाचं ब्रह्मास्त्र दिलेलं आहे, त्याचा वापर करून लोकशाहीला गिळंकृत करू पाहणार्‍या राक्षसी राजवटीचा नायनाट करण्यासाठी प्रा. आढाव सरांना निवडून द्यावे. यामाध्यमातून फलटण तालुक्यात क्रांती करावी, असे आवाहन राजू शेट्टी यांनी फलटण तालुक्यातील मतदारांना केले आहे.


Back to top button
Don`t copy text!