रामभाऊ पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आटपाडीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०१ मे २०२२ । आटपाडी । कडक उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या आणि उशीरा होणाऱ्या पाणी पुरवठ्याने हतबल झालेल्या आटपाडी शहर वाशीयांच्या सोयीसाठी आटपाडीत टँकरने सर्व भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय रामभाऊ पाटील प्रतिष्ठानने घेतला आहे .
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अक्षय तृतीया आणि रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या आटपाडी शहर वाशीयांना, विविध वाड्या, वस्त्या, गाव भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय आटपाडी तालुक्याचे नेते भारततात्या पाटील आणि युवा नेते सौरभ भैय्या पाटील यांनी घेतला आणि टॅकरद्वारे पाणी पुरवठ्याच्या पुजनाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला .
हनुमान चालीसा, महाआरती, अजान, भोंगे च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सामाजीक वातावरण गढुळ केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर *राम* भाऊ पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आणि *मारुती आप्पा उर्फ दत्तात्रयआप्पा पाटील* यांच्या सुपुत्र आणि नातवाने सामाजीक भान ठेवून रामभाऊचाच भाईचारा आबादीत ठेवल्याची प्रतिक्रिया मुस्लीम बहुल वस्त्यां, गल्यांमधून व्यक्त होत होती .
पाण्याच्या पहिल्या टँकरचे पुजन राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक , वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्ह्याचे नेते अरुण वाघमारे, राष्ट्रवादीचे नेते विष्णुपंत चव्हाण, मॉडर्न शिक्षण संस्थेचे विश्वस्त अजित चव्हाण सर,विष्णूपंत काळेबाग, जयंत पाटील पत संस्थेचे चेअरमन अतुल यादव, रामभाऊ पाटील सोसायटीचे चेअरमन राजाराम पाटील, सामाजीक कार्यकर्ते बापूराव मगर, चौंडेश्वरी पतसंस्थेचे मुख्य विश्वस्त चंद्रकांत दौंडे, भिमराव जाधव, मनोहर विभूते,
जितेंद्र जाधव, माजी प्राचार्य बी. ए. पाटील माजी मुख्याध्यापक आर. एस. पाटील ,बिटू देशमुख,मुरलीधर आबा पाटील, राहुल हेकणे, शंकर गिड्डे, जालींदर खंडागळे,भारत दिवटे, विजय बालटे,अशोक लवटे,कृष्णा जाधव, सचिन सुतार, गणेश गायकवाड, सुरज जाधव, पप्पु हजारे, दीपक हजारे, मयूर शिंदे,सुशांत गुळीक, आदर्श लांडगे , सुमित चव्हाण, श्रीनाथ पाटील, अक्षय लवटे , रोहीत दिवटे, निखिल दिवटे, तुषार लांडगे,नरेंद्र कोळी,सागर पाटील इत्यादी अनेक मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बंडु सुर्यवंशी आणि प्रकाश जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त या दोघांचा भारततात्या पाटील यांच्या हस्ते आणि सौरभभैय्या पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करणेत आला .

Back to top button
Don`t copy text!