सनटेकचे वसईतील सुरुची बीचवर ‘लाईफ बाय द सी’ अभियान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२२ । मुंबई । सनटेक रियल्टीच्या सनटेक फाऊंडेशनने आपल्या ‘लाईफ बाय द सी’ उपक्रमांतर्गत वसईच्या सुरुची बीचवर शाश्वत, पर्यावरणस्नेही जीवनशैली मोहिमेचे आयोजन केले आहे. या समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखण्याच्या उद्देशाने युनायटेड वे मुंबईच्या सहयोगाने ही मोहीम राबवण्यात आली.

सप्टेंबर २०२२ हा ‘कोस्टल क्लीन-अप’ महिना म्हणून साजरा केला जात आहे. त्याला पाठिंबा देत सनटेक रियल्टीच्या सनटेक फाऊंडेशनने या महिन्यामध्ये पर्यावरणस्नेही जीवनशैलीसाठी तीन मोहिमा आयोजित केल्या, यामध्ये जुहू, वर्सोवा आणि सुरुची या तीन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश करण्यात आला. शहराच्या प्राचीन व नैसर्गिक समुद्रकिनाऱ्याच्या संवर्धनाला प्रोत्साहन देणे या मोहिमेचा उद्देश आहे. सनटेक फाऊंडेशनने समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण व संवर्धनाची मोहीम याआधी देखील चालवली होती. त्यासोबतच आपल्या ‘लाईफ बाय द सी’ अभियानांतर्गत देखील सनटेक फाऊंडेशन समुद्रकिनाऱ्यांच्या देखरेखीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावे यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अभिनेत्री दिया मिर्झा, नेहा धुपिया आणि मिथिला पालकर यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रयत्नांमार्फत लोकांमध्ये आरोग्यदायी सवयी आणि एकंदरीत कल्याण यांना प्रोत्साहन दिले जाते. समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य वाढवण्याबरोबरीनेच या उपक्रमामध्ये जगभरातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे याठिकाणी देखील पायाभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यावर भर दिला जातो. या अभियानांतर्गत सनटेक फाऊंडेशनने वसईमध्ये सुरुची समुद्रकिनाऱ्यावर आणि आजूबाजूच्या भागात बीच रोड, झाडे आणि इतर पायाभूत सेवासुविधांच्या विकासाला प्रोत्साहन दिले आहे.

सनटेक रियल्टी लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. कमल खेतान यांनी सांगितले, “आम्ही आपल्या धोरण संरचना, उपक्रम, देखरेख प्रणाली व प्रमुख ईएसजी सिद्धांत प्रत्यक्षात अंमलात आणून आपली ईएसजी वचनबद्धता मजबूत केली आहे. आम्ही असे मानतो की, पर्यावरणस्नेही जागांच्या विकासासाठी वचनबद्ध कंपनी म्हणून आम्ही लोकांमध्ये पर्यावरणस्नेही आरोग्याला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. मुंबई शहराच्या समुद्रकिनाऱ्यांवरील निसर्ग आणि सौंदर्य अबाधित राखले जावे आणि पर्यावरणस्नेही जीवनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ‘लाईफ बाय द सी’ उपक्रम चालवत आहोत.”


Back to top button
Don`t copy text!