राजे गटाचे सनी भोईटे भाजपात


स्थैर्य, फलटण, दि. ०९ नोव्हेंबर : राजे गटाचे कट्टर कार्यकर्ते व बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष सनी भोईटे यांनी राजे गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर फलटणच्या राजकीय वर्तुळात नवीन समीकरणांना चालना मिळाली असून राजे गटासाठी ही आणखी एक मोठी गळती मानली जात आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सनी भोईटे यांनी भाजपमध्ये दाखल होत महायुतीच्या तयारीला बळ दिले आहे. गेल्या काही दिवसांत पहिल्या फळीतील नेत्यांसोबतच आता दुसऱ्या पळीतले प्रभावी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने महायुतीत प्रवेश करत असल्याचे चित्र आहे.

सनी भोईटे यांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवरील संघटनबांधणीला अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकीत भाजप–राष्ट्रवादी महायुतीची ताकद वाढेल, असा अंदाज पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश विशेष महत्त्वाचा ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!