दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । फलटण । कोरोना ह्या वैश्विक महामारीमध्ये अनेकांना ऑक्सिजनच्या अभावी आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. वृक्ष तोडीमुळे दिवसेंदिवस ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. सनी अहिवळे यांनी फलटण शहरामध्ये एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
फलटण शहरातील मंगळवार पेठ येथे माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी एक हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ना. श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सनी अहिवळे, सुधीर अहिवळे, प्रशांत अहिवळे, बाळासाहेब काकडे, सनी काकडे, संग्राम अहिवळे, हरीश काकडे, शिवा अहिवळे, सुधीर अहिवळे, सिद्धार्थ अहिवळे, अविनाश सरतापे, सनी मोरे, मंगेश जगताप, सागर अहिवळे, राकेश माने, रवि गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फलटण शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्षलागवडीची गरज ओळखून जास्तीत जास्त वृक्षारोपण करून फलटण शहर हे हरित शहर बनवणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून आपण आता प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोनासारखे जर कोणतेही संकट आपल्यावर आले तर नैसर्गिक रित्या ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये यासाठी आमचे नेते व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरामध्ये एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. तरी फलटण शहरामध्ये कोणतीही परवानगी काढताना एक झाड लावण्याची शिफारस नगरपरिषदेच्या वतीने करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी यावेळी केली.