स्थैर्य, फलटण : जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊनमुळे गोर गरीब जनतेचे हाल होत आहेत. अशामध्ये वेगवेगळ्या स्तरातून मदतीचे हात पुढं येऊ लागले आहेत. फलटण मधील नगरसेवक सनी अहिवळे यांनी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार पेठ येथील गरजु कुटुंबांना स्वखर्चाने किराणा माल पोहोचवण्याची काम स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. लाॅक डाऊन सुरूच राहिले तर लोकांचे हाल वाढत राहणार आहे.
संचारबंदीचे आदेश शिथिल झाल्यानंतर कामगारांना काम करण्यास शासनाने परवानगी दिली, परंतु दुर्दैवाने मंगळवार पेठ येथे कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण सापडला आणि पुन्हा मंगळवार पेठ सील करण्यात आली. सनी अहिवळे यांनी पुन्हा मदतीचा हात पुढं करित गरजु कुटूंबांना किराणा माल व भाजी पाला मोफत पुरवठा कलेला आहे. सनी अहिवळे यांनी जे सत्कार्य केले त्याचे जनतेतून कौतुक होत आहे.