दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । मुंबई । वीजेचे सतत वाढते बिल आणि कडक उन्हाळ्यामध्ये होणारा विजेचा वारेमाप वापर यांची चिंता दूर करण्यासाठी देशातील अग्रगण्य फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स (एफएमईजी) उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या सूर्या रोशनीने आधुनिक घरांच्या गरजा पुरविण्यासाठी आधुनिक पंख्यांची एक नवीन श्रेणी बाजारात दाखल केली. बीएलडीसी तंत्रज्ञानाचे पाठबळ लाभलेली एसएस-३२ प्राइम नावाची ही नवी श्रेणी पारंपरिक पंख्यांच्या तुलनेत ६० टक्क्यांहून अधिक ऊर्जाबचत करतेव केवळ ३२ वॅट्स वीज वापरत ३४० आरएमपी इतका उच्च वेग गाठते.
अक्षरश: भाजून काढणा-या भारतीय उन्हाळ्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या नव्य श्रेणीतील पंखे हे सूर्या रोशनीच्या संशोधन आणि विकास पथकाने देशातच विकसित केले आहेत व आजच्या काळातील आधुनिक आणि उच्च अभिरूची असणा-या ग्राहकवर्गाची आवडनिवड ओळखून त्यांची रचना करण्यात आली आहे. या पंख्यांमध्ये प्रगत तंत्रज्ञान, उच्च दर्जाची कामगिरी आणि उत्कृष्ट डिझाइन यांचा मिलाफ घडून आला आहे. अशाप्रकारचे पंखे बाजारात प्रथमच दाखल झाले आहेत. या नव्या एसएस-३२ प्राइम पंख्यांची किंमत ५२५५ रुपये इतकी असून सूर्या रोशनीचे हे नवे उत्पादन खरोखरीच ग्राहकांच्या पैशांची किंमत पुरेपूर वसूल करून देणारे आहेत.
सूर्या रोशनीच्या लाइटिंग अँड कन्झ्युमर ड्युरेबल्स विभागाचे एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर आणि सीईओ निरुपम सहाय म्हणाले, “सीलिंग फॅन्समध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फारसे नवे प्रयोग झालेले नाहीत. अशा काळात भारतातील या उद्योगक्षेत्रामध्ये क्रांती घडविण्यास सज्ज असलेल्या या तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत पंख्यांची मालिका घेऊन येत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. कंपनीच्या स्वत:च्या संशोधऩ व विकास पथकाने संकल्पित केलेले आणि डिझाइन केलेले हे पंखे म्हणजे उत्तम रचना आणि उच्च दर्जा यांच्याप्रती असलेल्या आमच्या अढळ बांधिलकीचे द्योतक आहेत. आजच्या काळातली चोखंदळ ग्राहकांच्या प्रथम पसंतीचा ब्रँड म्हणून बाजारपेठेतील आपले स्थान अधिक भक्कम करण्याच्या आमच्या धोरणाचा एक भाग म्हणून ही नवीन श्रेणी आम्ही दाखल करत आहोत. उच्च तंत्रज्ञान, शैलीदार सौंदर्य या प्रमुख स्तंभांवर आधारलेली आमची नवीन उत्पादने सातत्याने ग्राहकांच्या भेटीला आणण्याशी आम्ही कटिबद्ध आहोत व यामुळे सूर्या रोशनीची एक अभिनव ब्रॅण्ड ही प्रतिमा ग्राहकांच्या मनामध्ये पक्की होण्यास मदत होणार आहे.“
एसएस-३२ प्राइम व्यतिरिक्त सूर्या रोशनीच्या अॅल्टस, अॅडमीरा, ओरेट्टा आणि ऑप्टिम या डेकोरेटिव्ह पंख्यांच्या श्रेणीमध्ये अनोख्या अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-डस्ट यांचे एकत्रित कोटिंग असलेले पंखेही उपलब्ध आहेत. या पंख्यांमध्ये अचूकतेने तयार करण्यात आलेले आणि सौंदर्यमूल्य जपून तयार करण्यात आलेले विविध रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत, जे आधुनिक ग्राहकवर्ग व त्यांच्या नव्या संकल्पनांनुसार सजवल्या गेलेल्या घरांना साजेसे आहेत.