
स्थैर्य, फलटण, दि. ३१ मार्च : फलटण येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती सुनीता हणमंत सहस्त्रबुद्धे यांचे आज (मंगळवारी) वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या एलआयसीचे (LIC) श्री. सुरेंद्र सहस्त्रबुद्धे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रीमती सुनीता सहस्त्रबुद्धे यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ७.३० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून (डॉ. जे. टी. हॉस्पिटल शेजारी, रिंग रोड, फलटण येथून) निघणार आहे.

