स्थैर्य, फलटण, दि.११: सातारा जिल्हाधिकारी यानी दि.6 जून 2021 रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन मार्केट मध्ये गर्दी टाळणेच्या दृष्टिकोनातुन आणि फलटण तालुका अडत व भुसार व्यापारी असोसिएशन यांचेशी झालेल्या चर्चेस अनुसरुन रविवार चे भुसार मार्केट पुर्णतः बंद राहील याची नोंद सर्व शेतकरी, अडते, खरेदीदार, हमाल व मापाडी, वाहतूकदार व इतर घटकांनी घ्यावी असे आवाहन बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
याबाबत बाजार समितीचे सचिव शंकर सोनवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार चे भुसार मार्केट पुर्णतः बंद राहील. भुसार आवक बुधवारी उतरवून घेतली जाईल व गुरुवारी भुसार लिलाव होतील. कांदा आवक सोमवारी उतरवून घेतली जाईल व कांदा मार्केट लिलाव मंगळवारी होतील. सदर भुसार लिलाव कामकाज सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेतच पूर्ण करावयाचे असून बाजार समितीच्या आवारात मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझर चा वापर करणे अनिवार्य आहे.