
दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२२ । फलटण । कृषी विकास प्रतिष्ठान, बारामतीच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील सरोज व्हीला या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी श्रीमंत सईबाई महाराज नागरी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, फलटण सॅटेलाईट रोटरी क्लबचे चेअरमन श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर व फलटण तालुक्याच्या युवा नेत्या श्रीमंत सौ. मिथिलाराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी कृषी विकास प्रतिष्ठान, बारामतीच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार यांचा यथोचित सन्मान केला.
कृषी विकास प्रतिष्ठान, बारामतीच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार व श्रीमंत सईबाई महाराज नागरी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमंत सौ. शिवाजंलीराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.