उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर युवा खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर; उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 18 एप्रिल 2025। फलटण । खेळ आणि व्यायामाला या आजच्या युगात आपण महत्त्व दिले पाहिजे. बौधिक विकासबरोबर शारीरिक विकासाची जोड मिळाली पाहिजे या हेतूने फलटण एज्युकेशन सोसायटी च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 3 ठिकाणी आयोजित करण्यात आले असून श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई व एसएससीच्या क्रीडांगणावर, मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर व माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे.

या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन चे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजीराव घोरपडे होते.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य वसंत कृष्णा शेडगे, माजी प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, महादेव माने, संजय फडतरे, स्वप्निल पाटील, प्राचार्य सौ. अंजुम शेख, उपप्राचार्य सौ. स्नेहल भोसले, माजी नगरसेवक अभिजीत भोसले, तुषार नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, युवा खेळाडूंसाठी खेळामध्ये करिअर करण्याचे एक उत्तम व्यासपीठ म्हणजे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर आहे. या शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंना खेळाची आवड निर्माण होते. करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर हे एक व्यासपीठ आहे. शिवाजीराव घोरपडे यांनी उपस्थित खेळाडूंना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.

सचिन धुमाळ म्हणाले, उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर मंगळवार 15 एप्रिल 2025 ते शुक्रवार दि. 25 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये होत आहे. या शिबीरात हॉकी, फुटबॉल खो-खो, स्केटिंग, आर्चरी अ‍ॅथलेटिक्स, कराटे या खेळाचा समावेश आहे. प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन दररोज सकाळी 6.00 वा. ते 8.00 वा. या वेळेत होणार आहे. याशिवाय विशेष मार्गदर्शन विविध तज्ञ मार्गदर्शकांकडून होणार आहे. यामध्ये खेळाडूंचा आहार, शारीरिक तंदुरुस्ती व दुखापतीचे पुनर्वसन, योगा यासह या विषयावर केले जाणार आहे.

शिबिरातील सहभागी सर्व विद्यार्थी यांना दररोज सकाळी मैदानावरील सराव झाल्यानंतर नाश्ता, केळी, सुगंधी दूध, बिस्किट व उकडलेले कडधान्य असा पौष्टिक अल्पोहार दिला जाणार आहे. शिबिरातील खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .

या शिबिरामध्ये थलेटिक्ससाठी राज जाधव, जनार्दन पवार,तायाप्पा शेडगे, आर्चरी, कराटे या खेळासाठी सुरज ढेंबरे, प्रिया शेडगे, फुटबॉल व स्केटिंग या खेळासाठी अमित काळे, मोनील शिंदे, खो-खो या खेळासाठी कुमार पवार, सुहास कदम, अविनाश गंगतीरे, सौ. मुलानी, हॉकी या खेळासाठी बी. बी. खुरंगे, सचिन धुमाळ, धनश्री क्षीरसागर हे मार्गदर्शन करणार आहेत. क्रीडा समितीचे सदस्य तायप्पा शेंडगे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!