ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल येथे समर कॅम्पचे आयोजन


दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । फलटण । गुणवरे, ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनियर कॉलेज या विद्यालयात संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे यांच्या संकल्पनेतून समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

या समर कॅम्प मध्ये दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये कुस्ती, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, योगा, डांस, बुद्धिबळ या खेळाचे प्रशिक्षण देण्यात येईल.

या प्रशिक्षणाचा कालावधी 5 मे 2022 ते 20 मे 2022 पर्यंत राहील. प्रशिक्षणाची वेळ सकाळी 8:00 ते 11:00 अशी असून तज्ञ प्रशिक्षकां मार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी शाळेच्या 7769889898 या मोबाईल क्रमांकावर  संपर्क करण्याचे आवाहन शाळेचे प्राचार्य गिरिधर गावडे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!